पुणे- राष्ट्रीय नागरिक नोंदणी (एनआरसी) आणि सुधारित नागरिकत्व कायद्याला (सीएए) विरोध करण्यासाठी 'हम भारत के लोग' ही चळवळ उभी करण्यात आली आहे. या चळवळीत आता 125 हून अधिक संघटना सहभागी झाल्या आहेत. हे केवळ मुस्लिम समाजाचे नाही तर सर्वच समाजाचे आंदोलन झाले आहे. याचे आता 'भारत जोडो' या आंदोलनात आम्ही रुपांतर करत आहोत. ते तोडायचे काम करतील, आम्ही जोडायचे काम करु, अशा शब्दात स्वराज इंडिया पक्षाचे प्रमुख योगेंद्र यादव यांनी मोदी आणि शहा यांच्यावर टीका केली. पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
सीएए, एनआरसी आणि एनपीआरच्या विरोधात भारत जोडो आंदोलन करण्यात येणार आहे. 22 फ्रेब्रुवारी ते 23 मार्च या दरम्यान या कायद्यांविषयी नागरिकांमध्ये जागृती करणार असल्याचेही यादव यांनी यावेळी स्पष्ट केले. यादव म्हणाले, एनपीआरच्या माध्यमातून एनआरसी आणले जात आहे. एनपीआर आणि जनगणनेचा कुठलाही संबंध नाही. जनगनणेचा वेगळा कायदा आहे. एनपीआर हे सीएए कायद्याच्या अंतर्गत येते.
हेही वाचा -बीएसएनएलमधून 78 हजार 500 कर्मचाऱ्यांची स्वेच्छा निवृत्ती