पुणे -आज जागतिक चिमणी दिवस आहे. चिमण्यांची संख्या वाढावी त्यांचं संरक्षण व्हावं या करता अनेक जण प्रयत्न करत असतात. मात्र पुणे जिल्ह्यात एक अंस गाव आहे, जे गाव चिमण्यांच गाव म्हणून ओळखलं जातं. पाहुयात महाराष्ट्रातील एकमेव चिमण्यांच्या गावावरील हा खास रिपोर्ट
गावात चिमण्यांची संख्या 3 टक्क्यांवरून 98 टक्क्यांवर
भोर तालुक्यातील पिसावरे हे गाव चिमण्यांचे गाव म्हणून ओळखले जाते. पिसावरे माध्यमिक विद्यालयाच्या वतीने चिमण्यांची संख्या वाढावी व त्यांचे संरक्षण व्हावं या करता, अनेक वर्षांपासून प्रयत्न केला जात आहे. त्याचा परिणाम म्हणून आता या पिसावरे गावात चिमण्यांची संख्या 3 टक्क्यांवरून 98 टक्क्यांवर पोहोचली आहे. म्हणूनच पिसावरे हे गाव चिमण्यांचे गाव म्हणून ओळखलं जात आहे. गावातील प्रत्येक घरासमोर विद्यार्थ्यांनी चिमण्यांसाठी घरटी बांधून, अन्नपाण्याची सोय केली आहे. हे विद्यार्थी चिमण्यांविषयी गावातील लोकांना माहिती देखील देतात.