पुणे - अवघा महाराष्ट्र सध्या वारीमय झाला आहे. महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून वारकरी वारीमध्ये सहभागी होत असल्याने प्रबोधनासाठी या संधीचा उपयोग केला जात आहे. महिला आयोगानेसुद्धा महिलांच्या सक्षमीकरणासाठी, त्यांच्या आरोग्यासाठी वारीचा उपयोग करून घ्यायचा निर्णय घेतला आहे. महिला आयोगाने यंदा वारीत नारीशक्तीचा चित्ररथ तयार केला आहे. या चित्ररथाच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाची दिंडी काढली जाणार आहे.
महिला सक्षमीकरणासाठी महिला आयोगाचा पुढाकार, वारीत 'नारीशक्ती चित्ररथा'च्या माध्यमातून करणार प्रबोधन - Nari shakti campaign
अवघा महाराष्ट्र सध्या वारीमय झाला आहे. महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून वारकरी वारीमध्ये सहभागी होत असल्याने प्रबोधनासाठी या संधीचा उपयोग केला जात आहे. महिला आयोगानेसुद्धा महिलांच्या सक्षमीकरणासाठी, त्यांच्या आरोग्यासाठी वारीचा उपयोग करून घ्यायचा निर्णय घेतला आहे.
या चित्ररथाचा आणि दिंडीचा गुरुवारी पुण्यात शुभारंभ करण्यात येणार आहे. पुण्यातील शनिवार वाडा येथून हा चित्ररथ तसेच वारी नारीशक्तीची दिंडी निघणार असल्याची माहीती राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी दिली आहे. या माध्यमातून ५ लाख महिलांपर्यंत पोहोचण्याचे आयोगाचे उद्दीष्ट आहे. तुकाराम महाराज तसेच ज्ञानेश्वर महाराज अशा दोन्ही पालख्यांमध्ये हे चित्ररथ असणार आहेत. ज्यामध्ये सॅनिटरी नॅपकिन्सची वेंडिंग मशीन आणि त्यांची विल्हेवाट लावण्यासाठी इंसीनरेटर मशीन असणार आहेत. मासिक पाळीतील स्वच्छतेबाबत जागृती करण्याचा यामागे हेतू आहे. त्याचबरोबर महिला सक्षमीकरणाचे संदेश देण्यासाठी वारीच्या दोन्ही मार्गावर फिरता चित्रपट महोत्सव आयोजीत केला जाणार आहे. तसेच महिला कीर्तनकार पोवाडाकार आणि भारूडकार याही ठिकाणी कार्यक्रम आयोजीत केले जाणार आहेत. त्यामध्ये महिला सक्षमीकरण या संकल्पनेवर कार्यक्रम घेतले जाणार आहेत. तसेच दिंडीमध्ये दररोज एका क्षेत्रातील नामवंत महिलांना सहभागी करून घेतले जाणार आहे.