महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

लठ्ठपणामुळे सासरच्यांनी माहेरी आणून सोडले; विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या - fat

प्रियंकाचा फलटण येथील केदार पेठकरसोबत विवाह झाला होता. लग्न झाल्यापासूनच 'तू लठ्ठ आहेस' असे म्हणत सासरचे प्रियांकाचा छळ करत होते. तसेच घटस्फोटासाठीही ते तिच्यावर दबाव टाकत होते.

संग्रहित छायाचित्र

By

Published : May 29, 2019, 10:28 AM IST

पुणे- लठ्ठपणामुळे सासरच्यांनी माहेरी आणून सोडल्यामुळे विवाहित महिलेने आत्महत्या केल्याची घटना पुण्यातील भोसरी येथे घडली. प्रियांका पेठकर असे या महिलेचे नाव आहे. भोसरीतील राहत्या घरी गळफास घेत तिने आयुष्य संपवले.

तीन वर्षांपूर्वी प्रियंकाचा फलटण येथील केदार पेठकरसोबत विवाह झाला होता. लग्न झाल्यापासूनच 'तू लठ्ठ आहेस' असे म्हणत सासरचे प्रियांकाचा छळ करत होते. तसेच घटस्फोटासाठीही ते तिच्यावर दबाव टाक होते. शिवाय लठ्ठ असल्याच्या कारणावरून प्रियांकाला एक वर्षांपूर्वी सासरच्या मंडळींनी माहेरी आणून सोडले होते. तेव्हापासून प्रियांका तणावात होती. यातूनच तिने गळफास घेऊन आत्महत्या केली.

याप्रकरणी तिच्या भावाने फिर्याद दिली असून भोसरी पोलीस ठाण्यात पती, सासू-सासरे आणि आणखी एका व्यक्तीविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details