पुणे - कोरेगाव-भीमा येथे राहत्या घरात महिलेचा मृतदेह आढळला आहे. या महिलेची हत्या झाल्याचा सशंय व्यक्त केला जात आहे. प्रियांका प्रधान असे २१ वर्षीय मृत महिलेचे नाव आहे. ती मुळची ओरिसा राज्यातील रहिवासी होती.
कोरेगाव-भीमा : राहत्या घरात आढळला महिलेचा मृतदेह, हत्येचा संशय
महिलेची हत्या पतीनेच केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
महिलेचा मृतदेह बाहेर काढताना
कोरेगाव-भीमा येथील प्रियांका राहत असलेल्या घरातून आज सकाळी दुर्गंधीचा वास येऊ लागला. ही माहिती शेजारी राहणाऱ्या नागरिकांनी पोलिसांना कळविली. पोलिसांनी त्या घरात प्रवेश केल्यानंतर घरात महिलेचा मृतदेह आढळून आला. या महिलेचा मृत्यू दोन-तीन दिवसांपूर्वी झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. महिलेची हत्या पतीनेच केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. त्यादिशेने शिक्रापूर पोलिसांचा तपास सुरू आहे.