पुणे- हिंजवडी आणि वाकड हे आयटी हब म्हणून ओळखले जाते, यामुळे शहराची ओळख अवघ्या देशात आहे. परंतु, अशा उच्चभ्रू परिसरात चक्क चारचाकी वाहनाची लाईट सुरू ठेवून अंत्यविधी करण्याची वेळ येथील नागरिकांवर आली आहे. वाकड परिसरातील स्मशानभूमीतील वीज पुरवठा खंडीत झाल्याने ही वेळ आल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात येत आहे.
आयटी हब पुण्यातील स्मशानभूमीत काळोख; वाहनाची लाईट लावून केला अंत्यविधी - Graveyard
रात्रीच्या वेळी वाकड परिसरातील स्मशानभूमीत वीज पुरवठा खंडित झाल्याने परिसरात काळोख झाला होता, काही दिसत नसल्याने अखेर वाहनाची लाईट लावून अंत्यविधी करण्याची वेळ येथील स्थानिक नागरिकांवर आल्याचे पाहायला मिळाले आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, पिंपरी-चिंचवड शहर हे स्मार्ट सिटीकडे वाटचाल करत आहे. वाकडमध्ये अनेक उच्चभ्रू वसाहती आहेत. एकीकडे आम्ही स्मार्ट आहोत असा बोभाटा करणाऱया महानगरपालिकेचा भोंगळ कारभार समोर आला. रात्रीच्या वेळी वाकड परिसरातील स्मशानभूमीत वीज पुरवठा खंडित झाल्याने परिसरात काळोख झाला होता, काही दिसत नसल्याने अखेर वाहनाची लाईट लावून अंत्यविधी करण्याची वेळ येथील स्थानिक नागरिकांवर आल्याचे पाहायला मिळाले आहे. यामुळे नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्यांवर खोदकाम सुरू आहे. त्यामुळेही चिखल झाला असून याचा नाहक त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे.