पुणे -भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे नागालँडचे राज्यपाल होणार असल्याचे माझ्या कानावर आले आहे. त्यामुळेच त्यांनी माजी मंत्री म्हणू नका, असे म्हटले असावे, असे विधान शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी केले होते. त्यावर संजय राऊत यांना अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष म्हणून पाठवणार असल्याचे मला कळतेय, असा टोमणा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्यानिमिताने महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते अविरत कार्यरत सेवावर्तींचा सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी चंद्रकांत पाटील यांनी बोलताना संजय राऊत यांना टोला लगावला. दरम्यान, या कार्यक्रमाला खासदार गिरीश बापट, महापौर मुरलीधर मोहोळ आणि भाजपा शहर अध्यक्ष जगदीश मुळीक आदी उपस्थित होते.
- आत्ता फक्त 24 तासच झाले -