महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'पीएमपी बसेसमध्ये 'मिस्ट' यंत्रणा बसवून मोबाईल सॅनिटायझर चेंबर सुरू करणार'

सध्या प्रायोगिक तत्वावर पीएमपीच्या तीन जुन्या बसेसमध्ये सॅनिटायझर शॉवर टनेल्स यंत्रणा बसवण्यात आली आहे. या बसेस भाजी मंडई सारख्या ज्यास्त गर्दी होणाऱ्या ठिकाणी उभ्या केल्या जातील आणि लोकांना सॅनिटाईज केले जाईल, अशी योजना असून लवकरच ती अमलात देखील आणली जाणार आहे.

pune mnc
पुणे महानगर पालिका

By

Published : Apr 4, 2020, 9:38 PM IST

पुणे- कोरोनाचा संसर्ग होऊ नये, यासाठी शहरातील डॉ. नायडू सांसर्गिक रुग्णालयाच्या प्रवेश द्वारावर निर्जंतुकीकरण यंत्रणा म्हणजेच मिस्ट चेंबर बसवण्यात आले आहे. या धर्तीवर शहरातील इतर गर्दीच्या ठिकाणीही फिरते सॅनिटायझर टनेल्स उभारले जाणार आहेत, अशी माहिती पुणे मनपाचे आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिली आहे.

माहिती देताना पुणे महानगर पालिकेचे आयुक्त शेखर गायकवाड

सध्या प्रायोगिक तत्वावर पीएमपीच्या तीन जुन्या बसेसमध्ये सॅनिटायझर मिस्ट यंत्रणा बसवण्यात आली आहे. या बसेस भाजी मंडईसारख्या जास्त गर्दी होणाऱ्या ठिकाणी उभ्या केल्या जातील आणि लोकांना सॅनिटाईज केले जाईल, अशी योजना असून लवकरच ती अमलात देखील आणली जाणार आहे, अशी माहिती आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिली.

हेही वाचा-विनाकारण घराबाहेर फिरणाऱ्यांवर आळा घालण्यासाठी 'हौसिंग सोसायट्यांना नोटीस'

ABOUT THE AUTHOR

...view details