पिंपरी-चिंचवड (पुणे) : पिंपरी-चिंचवड शहरातील वाकड परिसरात पतीने पत्नीचा चारित्र्यावर ( Doubt on character ) संशय घेऊन खून केल्याची घटना उघडकीस आली ( wife killed in front of minor daughter in pune ) आहे. अवघ्या नऊ वर्षीय मुलीच्या समोरच तिच्या आईला संपवले आहे. या प्रकरणी रमेश पुजारीला वाकड पोलिसांनी अटक केली आहे. ललिता पुजारी असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. ही घटना मध्यरात्री काळाखडक येथे घडली आहे.
Pune Murder : चारित्र्यावर संशय! अल्पवयीन मुलीसमोरच केला पत्नीचा खून - Pimpri Chinchwad Latest News
पुण्यात एक खळबळजनक घटना घडली आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील वाकड परिसरात पतीने पत्नीचा चारित्र्यावर ( Doubt on character ) संशय घेऊन खून केल्याची घटना उघडकीस आली ( wife killed in front of minor daughter in pune ) आहे. अवघ्या नऊ वर्षीय मुलीच्या समोरच तिच्या आईला संपवले आहे. या प्रकरणी रमेश पुजारीला वाकड पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,पुजारी दाम्पत्याला तीन अपत्य आहेत, त्यापैकी दोघे त्यांच्यासोबत राहतात. रमेश पुजारी आणि ललिताचे पटत नव्हते. त्यांची दररोज भांडण व्हायचे. रमेश ला दारूच व्यसन होते. तो पत्नीच्या चारित्र्यावर संशय घ्यायचा. मध्यरात्री ललिता आणि रमेशचे वाद झाले. तेव्हा, चिडलेल्या रमेश पत्नीच्या डोक्यात फरशी घातली. तत्काळ घटनास्थळी दाखल होऊन जखमी अवस्थेतील ललिताला रुग्णालयात घेऊन जाण्यात आले. परंतू तिचा मृत्यू झाला आहे. याची माहिती वाकड पोलिसांना मिळाली. तिन्ही मुले आई वडिलांविना पोरकी झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. घटनेचा अधिक तपास वाकड पोलीस करत आहेत.
हेही वाचा -Sexting : धक्कादायक: मोबाईलवरुन 'सेक्सटिंग'च्या प्रमाणात वाढ, अशी ठेवा मुलांवर नजर