बारामती : राज्यात ठिकठिकाणी पूरग्रस्त परिस्थिती ( Flood situation in Maharashtra ) निर्माण झाली आहे. पूर परिस्थितीमुळे शेतकऱ्यांचे, नागरिकांचे अतोनात ( Loss of farmers due to flood ) नुकसान झाले आहे. पिकांमध्ये गोगलगायीचा प्रादुर्भाव वाढला आहे. मनुष्यहानीसह पशुधनाची हानी, घरांची पडझड झाली आहे. रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली आहे. राज्यातील शेतकरी आत्महत्या ( Farmer suicide ) सारखे पाऊल उचलण्याचा मनस्थितीत आहेत. हे महाराष्ट्राला शोभणारे नाही असे, विरोधी पक्षनेते अजित पवार ( Leader of Opposition Ajit Pawar ) यांनी बारामतीत पत्रकारांची बोलताना सांगितले. विरोधीपक्षनेते अजित पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला यावेळी ते बोलत होते.
मंत्रिमंडळाला महूर्त मिळेना -पावसाळी अधिवेशन नेहमी जुलै महिन्यामध्ये असते. आता ऑगस्ट सुरू झाला असताना त्यांना मंत्रिमंडळ विस्ताराला ( Cabinet expansion ) मुहूर्त मिळेना, की कुठून ग्रीन सिग्नल मिळेना का? हे समजायला मार्ग नाही. मंत्रिमंडळ करायला ते घाबरतात हे समजायला मार्ग नाही, असे म्हणत पूरग्रस्त भागातील नुकसानग्रस्त नागरिकांना तातडीने मदत अशी मागणी त्यांनी केली. तात्काळ मंत्रिमंडळ स्थापन करून, अधिवेशन बोलवून मदत करण्यात यावी असे राज्यपालांना भेटून सांगितल्याचे पवार म्हणाले.
संविधानाच्या अधीन राहून सरकारने काम करावे -राज्याचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांवर ठाकरे सरकारच्या काळात निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. अशा अधिकाऱ्यांना पुन्हा सेवेत रुजू करण्यात आले आहे. या प्रश्नावर बोलताना पवार म्हणाले की, यासंदर्भात मला काही माहिती नाही. मी कालपासून दौऱ्यावर आहे. राज्याचा विरोधीपक्षनेता म्हणून पूर्ण माहिती घेऊन याबाबत बोलणे जास्त उचित ठरेल. राज्यकर्ते बदलत असतात. सरकारमध्ये काम करत असताना कायदा नियम संविधानाच्या अधीन राहून प्रत्येकाने काम केले पाहिजे या विचाराचा मी आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.