महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

विक्रम लँडरची स्थिती लवकरच समजेल..! - चांद्रयान 2

चंद्राभोवती फिरणाऱ्या ऑरबीटरने विक्रम लँडरचे छायाचित्र पाठवले आहे.चांद्रयान 2 मोहिमेबाबत एक दिलासादायक बातमी आहे.

लीना बोकील, स्पेस अॅनिमेटर

By

Published : Sep 8, 2019, 8:13 PM IST

पुणे - चांद्रयान 2 मोहिमेबाबत एक दिलासादायक बातमी आली आहे. चंद्राभोवती फिरणाऱ्या ऑरबिटरने विक्रम लँडरचे छायाचित्र पाठवले आहे. इस्रोचे प्रमुख के. सिवन यांनी ऑरबिटरने विक्रम लँडरचे थर्मल छायाचित्र पाठवल्याची माहिती दिली.

विक्रम लँडरची स्थिती लवकरच समजेल


विक्रम लँडर शनिवारी चंद्राच्या पृष्ठभागावर सॉफ्ट लँडिंग करणार होते. मात्र, 2.1 किमी अंतर शिल्लक राहिले असताना त्याचा पृथ्वीसोबतचा संपर्क तुटला. अजूनही त्याच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरू आहे.

हेही वाचा - आंबेगाव विधानसभा: वळसे पाटलांच्या बालेकिल्ल्याला आढळराव पाटील देणार का धक्का?


लँडरचे छायाचित्र आणि स्थान मिळणे ही मोठी गोष्ट आहे. ऑरबीटरच्या शक्तीशाली इन्फ्रारेड कॅमेऱ्याने टिपलेले छायाचित्र इस्रोच्या हाती आला आहे. लँडरची संपर्क यंत्रणा सुरू होण्याची प्रतिक्षा शास्त्रज्ञांना आहे. त्यानंतरच विक्रम लँडर कुठल्या स्थितीमध्ये आहे, याची माहिती मिळेल असे मत पुणे येथील स्पेस अॅनिमेटर लीना बोकील यांनी ईटीव्ही भारतजवळ व्यक्त केले.

ABOUT THE AUTHOR

...view details