पुणे- संत तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी पंढरपूरच्या दिशेने निघाल्यावर पुण्यात 2 दिवस मुक्काम करतात. हा २ दिवसांचा मुक्काम म्हणजे दिवसाचा पुणेकरांसाठी वारकऱ्यांची आणि पर्यायाने संतांची सेवा करण्याची संधी उपलब्ध होते. पुण्यात नाना पेठ व भवानी पेठ या ठिकाणी या दोन्ही पालख्या थांबलेल्या असतात. या काळात परिसरातले मंडळ विविध संस्था तसेच खासगी पद्धतीने नागरिक वारकऱ्यांची सेवा करतात. काही लोक या नागरिकांना जेवण देतात, नाष्टा देतात तर कोणी मोफत वैद्यकीय सेवा पुरवत असतात. आणि काही लोक विविध वस्तू मोफत वाटप करतात. अशा पद्धतीने या वारीत पुणेकर नागरिक आपला हातभार लावत असतात.
आषाढी वारी : पुण्यात गेल्या कित्येक वर्षांपासून 'हे' शिख कुटुंबीय करतेय वारकऱ्यांची सेवा
पुण्यातले अमराठी नागरिक देखील वर्षानुवर्ष पुण्यात राहिल्यानंतर वारीच्या या सोहळ्यात एकदिलाने सहभागी होतात. संत तुकाराम महाराजांची पालखी नाना पेठ येथे थाबते. त्या निवडुंग विठ्ठल मंदिराच्या समोर खंदारी या शीख समाजातील कुटुंबाचे इलेक्ट्रिशियन दुकान आहे. अनेक वर्षांपासून ते या ठिकाणी व्यवसाय करत आहेत.
पुण्यातले अमराठी नागरिक देखील वर्षानुवर्ष पुण्यात राहिल्यानंतर वारीच्या या सोहळ्यात एकदिलाने सहभागी होतात. संत तुकाराम महाराजांची पालखी नाना पेठ येथे थाबते. त्या निवडुंग विठ्ठल मंदिराच्या समोर खंदारी या शीख समाजातील कुटुंबाचे इलेक्ट्रिशियन दुकान आहे. अनेक वर्षांपासून ते या ठिकाणी व्यवसाय करत आहेत. आणि प्रत्येक वर्षी तुकाराम महाराजांची पालखी मुक्कामाला आल्यानंतर या पालखीचे तुकाराम महाराजांच्या पादुकांचे दर्शन घेण्यासाठी येणाऱ्या वारकऱ्यांना मोफत नाष्टा चहा पुरवण्याचे काम हे कुटूंब करत आहे.
गेल्या कित्येक वर्षांपासून या कुटुंबाकडून वारकऱ्यांची सेवा करण्याचे काम मनोभावे सुरू आहे. येथे येणाऱ्या भाविकांना शाबुदाणा खिचडी, राजगिऱ्याचे लाडू, चहा, पोहे अशा प्रकारचा नाष्टा ते पुरवतात. हे काम ते पूर्ण दिवसभर करत असतात. या दिवशी संपूर्ण कुटूंब दुकानात हजर असते. दुकानातील कर्मचारी आणि कुटुंबीय मनोभावे वारकऱ्यांची सेवा करत असतात.