पुणे - संपूर्ण राज्यासह जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होत आहे. मात्र, या ठिकाणी मतदानावेळी अनुचित प्रकार घडल्याचे समोर आले आहे. पुण्यातील वडगाव शेरी मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुनील टिंगरे आणि पिंपरी मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अण्णा बनसोडे यांना मतदान केल्याचे सध्या व्हिडिओ सोशल मीडियामध्ये व्हायरल होत आहे. यामुळे मतदान केंद्रावरील सुरक्षा व्यवस्थेविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले.
हेही वाचा -मतसंग्राम : विखे-थोरात कुटुंबीयानी बजावला मतदानाचा हक्क