महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पुण्यातील राजगुरुनगर बाजारसमितीत भाजीपाल्याची आवक घटली; बाजारभाव तेजीत

मागील 8 दिवसांपासून सुरु असलेल्या पावसाचा फटका भाजीपाल्यावर झाला असून राजगुरुनगर बाजारसमितीत मेथी, कोथिंबिरीची आवक घटली आहे. मात्र, आवक कमी झाल्याने बाजारभाव तेजीत असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळत आहे.

राजगुरुनगर बाजारसमितीतील छायाचित्र

By

Published : Jul 30, 2019, 5:26 AM IST

Updated : Jul 30, 2019, 6:09 AM IST

पुणे- मागील 8 दिवसांपासून सुरु असलेल्या पावसाचा फटका भाजीपाल्यावर झाला असून राजगुरुनगर बाजारसमितीत मेथी, कोथिंबिरीची आवक घटली आहे. मात्र, आवक कमी झाल्याने बाजारभाव तेजीत असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळत आहे.

सध्या जोरदार पाऊस सुरु असल्याने मेथी व कोथिंबीरच्या शेताचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून उत्पादनात मोठी घट झाली आहे. मात्र, बाजारात मेथी व कोथिंबीरला चांगला बाजारभाव मिळत आहे. मात्र, शहरी भागात भाजीपाल्याच्या वाढत्या बाजारभावामुळे शहरी नागरिकांच्या खिशाला कात्री लागणार आहे.

पुण्यातील राजगुरुनगर बाजारसमितीत भाजीपाल्याची आवक घटली

सध्या मेथी कोथिंबीरने बाजारात भाव खाल्ला असला तरी उत्पादन खर्च, मजुरी व पावसामुळे होणारे नुकसान मोठे आहे. त्यामुळे वाढलेल्या बाजारभावातही नुकसानच सहन करावे लागत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

बाजारभाव(प्रति शेकडा)
मेथी - १ हजार ७००
कोथिंबीर - १ हजार ४००

Last Updated : Jul 30, 2019, 6:09 AM IST

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details