पुणे -शहरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेत शहरातील मुख्य पेठांबरोबरच अजून 22 ठिकाणे सील करण्यात आली आहेत. गेल्या आठवड्यात शहरातील मध्यवस्तीत असलेली भाजीमंडई बंद ठेवण्यात आली होती. मात्र गेल्या दोन ते तीन दिवसांपासून भाजीमंडई पुन्हा सुरू होईल, असा एक मॅसेज सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल होत होता. हा मॅसेज फेक असून नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असं आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
Lock Down : पुण्यातील भाजी मंडई ३ मे पर्यंत राहणार बंद; शहरातील २२ ठिकाणे सील - vegetable market
शहरात कोरोनाचा वाढता प्रदुभाव लक्षात घेत शहरातील मुख्य पेठांबरोबरच अजून 22 ठिकाणे सील करण्यात आली आहेत. या पार्श्वभूमीवर मात्र गेल्या दोन ते तीन दिवसांपासून भाजीमंडई पुन्हा सुरु होईल, असे सोशल मीडियाच्या माध्यमातून एक मॅसेज व्हायरल होत होता. हा मॅसेज फेक असून नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असं आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
पुण्यातील भाजी मंडई ३ मे पर्यंत राहणार बंद
सहपोलीस आयुक्त यांच्या आदेशानुसार शहराच्या मध्यवर्ती भागात असलेली भाजीमंडई येत्या 3 मे पर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. जर काही बदल करण्यात आले तर नागरिकांना त्यासंदर्भात कळविण्यात येईल अशा सूचनाही पोलिसांनी केल्या आहे.