पुणे - मेट्रो रेल्वे प्रकल्पासाठी नदी पात्रामध्ये खांब उभारण्यात आले आहेत. मुठा नदीच्या मूळ प्रवाहाला यामुळे अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या राज्यसभा सदस्य वंदना चव्हाण यांनी सरकाराला लक्ष्य केले आहे. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महापौर मुक्ता टिळक यांना १९९७ च्या पुराची आठवण करून देत, यासंदर्भात लवकर लक्ष देण्याची मागणी केली आहे.
मेट्रोच्या नदीपात्रातील कामावरून वंदना चव्हाण यांची मुख्यमंत्र्यांवर टीका - chavan
मेट्रो रेल्वे प्रकल्पासाठी नदी पात्रामध्ये खांब उभारण्यात आले आहेत. मुठा नदीच्या मूळ प्रवाहाला यामुळे अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे.
वंदना चव्हाण
यासंदर्भात वंदना चव्हाण यांनी नुकतीच समाज माध्यमांवर नाराजी व्यक्त केली आहे. त्यांच्या एका पोस्टमध्ये त्यांनी नदी पात्रामध्ये झालेल्या डम्पिंगचे फोटो प्रसिद्ध केले असून सुरू बांधकामावर प्रश्न उपस्थित केले आहेत. त्याप्रमाणेच महानगरपालिका १९९७ मध्ये आलेला पूर विसरली आहे का? असा प्रश्न ही त्यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात नदी पात्रातील मेट्रोच्या कामावरून राजकीय वाकयुद्ध रंगण्याची शक्यता आहे.