महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Pune Crime : हॉटेलची तोडफोड करत लुटले पैसे; पोलीस निरीक्षक नितीन नम यांनाही मारहाण - कोयता गँगवर कारवाई

पुण्यातील सिंहगड रोड परिसरातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कोल्हेवाडी येथे सराईत गुन्हेगाराने हॉटेलची तोडफोड करून कामगारांना मारहाण करत पैसे लुटल्याची घटना समोर आली आहे. तर याप्रकरणी आरोपीवर हवेली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे.

Pune Crime
हॉटेलची तोडफोड

By

Published : Jul 24, 2023, 3:46 PM IST

हॉटेलची केली तोडफोड

पुणे: कोल्हेवाडी येथील हॉटेलची तोडफोड करण्यात आली. गुन्हेगार इतक्यावरच थांबले नाही तर, त्यांनी हवेली पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन नम यांनाही मारहाण केली आहे. यामुळे पोलिसांना जर मारहाण होत असेल तर, सामान्य नागरिकांचे काय? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. सराईत गुन्हेगार वैभव ईक्कर आणि त्याच्या साथीदार इंद्रप्रस्थ हॉटेलमध्ये गेले असता, कर्मचाऱ्यांसोबत हुज्जत घालत बाटल्या फोडल्या.


कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण :रविवारी रात्री सराईत गुन्हेगार वैभव ईक्कर इंद्रप्रस्थ हॉटेलमध्ये आले होते. यावेळी त्यांनी कर्मचाऱ्यांशी हुज्जत घालून अरेरावी करण्यास सुरूवात केली. दारूच्या नशेमध्ये हॉटेलमधल्या सगळ्या बाटल्या फोडून टाकल्या. तसेच हॉटेलमध्ये सामानाची तोडफोड केली. यावेळी पोलीस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर पोलीस निरीक्षक नितीन नम यांनाही आरोपीने मारहाण केली आहे. त्यामुळे पोलिसांनाच मारहाण होत असल्याने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. पुढील तपास हवेली पोलीस करत आहेत.



गुन्हेगारांचे प्रमाण वाढत आहे: पुण्यात गेल्या काही महिन्यापासून गुन्हेगारांचे धाडस वाढतच चालले आहे. पोलिसांचा कुठलाही वचक गुन्हेगारांवर दिसत नाही. खुलेआम मारामारी करणे, हॉटेलमध्ये धुडगूस घालणे, रस्त्यात गुन्हेगारी कृत्य करणे, शिवाय कोयता गँग असे प्रकार वाढतच आहेत. त्यामुळे पुणे पोलिसांनी यावरती लवकर उपाययोजना करणे गरजेचे आहे, अशी मागणी जनतेतून होत आहे.

या आधीही अशीच एक घटना घडली होती :पुणे शहरात गेल्या काही दिवसांपासून शहरातील विविध ठिकाणी गँगच्या माध्यमातून दहशत पसरवली जात आहे. पोलिसांकडून कोयता गँगवर कारवाई देखील केली जात आहे. मात्र, असे असताना देखील पुणे शहरातील कोयता गँगची दहशत काही कमी होण्याचे नाव घेत नाही. कोयता गॅंगचा असाच एक गुन्हा समोर आला होता. पुणे शहरातील भवानी पेठेत तुमची हॉटेल चालवण्याची औकात आहे का? असे म्हणत कोयता गँगकडून हॉटेल निशा रेस्टॉरेन्टची 5 ते 6 जणांकडून तोडफोड करण्यात आली होती. याबाबत लष्कर पोलीस पोलीस स्टेशनमध्ये 6 अनोळखी व्यक्तींवर कारवाई करण्यात आली होती.

हेही वाचा -

  1. हॉटेलात जेवण न दिल्याने मद्यपींकडून मारहाण अन हॉटेलची तोडफोड
  2. Aurangabad Crime हॉटेल मालकाची दुचाकी पेटवत व्हिडिओ ठेवला स्टेटसला, दहशत माजवण्यासाठी केले कृत्य

ABOUT THE AUTHOR

...view details