महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Prakash Ambedkar On ED CBI : ईडी सीबीआयच्या भीतीने 7 लाख 65 हजार व्यावसायिकांनी सोडला देश - प्रकश आंबेडकर

2014 पासून आत्तापर्यंत देशभरातील तब्बल 7 लाख 65 हजार व्यवसायिकांनी देश सोडल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी दिली आहे. ज्यांची मालमत्ता 500 कोटींच्या पुढे असे व्यवसायिक देश सोडत असल्याचे प्रकाश आंबेडकर म्हणाले. तसेच 2014 नंतर भाजप सरकारच्या काळात सर्वाधिक हिंदूनी देश सोडल्याची माहिती प्रकाश आंबेडकर यांनी दिली.

Prakash Ambedkar
प्रकाश आंबेडकर

By

Published : Jan 28, 2023, 5:21 PM IST

सीबीआयच्या भीतीने ७ लाख ६५ हजार व्यावसायिकांनी सोडला देश - प्रकश आंबेडकर

पुणे : देशभरात गेल्या काही महिन्यांपासून विविध राजकीय पक्षातील नेते तसेच व्यवसायिकांवर ईडी सीबीआयची छापेमारी केली जात आहे. देशभरातील विरोधकांकडून यावर आक्षेप घेत सरकारवर टीका देखील केली जात आहे. असे असताना एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. 2014 सालापासून ते आत्तापर्यंत देशभरातील तब्बल 7 लाख 65 हजार व्यवसायिक ज्यांची मालमत्ता 500 कोटींच्या पुढे आहे असे व्यवसायिक देश सोडून इतर देशात गेल्याची धक्कादायक माहिती वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी दिली आहे.

व्यावसायिकांचे पलायन : शिवसेना, वंचित बहुजन आघाडीची युती झाल्यापासून प्रकाश आंबेडकर यांच्यावर टीका केली जात आहे. याबाबत ईटीव्हीने वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांची मुलाखत घेतली आहे. यावेळी ते म्हणाले की, 2016 साली इंटरनॅशनल मायग्रेशन मॉनिटर करणारे एक कमिशन साऊथ आफ्रिका येथे आहे. 2014 ते 2016 साल पर्यंत किमान 2 लाख 23 हजारच्या भारतीय व्यावसायीकांनी देश सोड्याची माहिती त्यांनी दिली आहे. ज्या व्यावसायीकांची मालमत्ता 500 कोटींच्यावर आहे, त्या व्यावसायीकांनी देश सोडल्याचे प्रकाश आंबेडकर म्हणाले.

व्यावसायिकांना सीबीआय, ईडीची भीती : आंबेडकर यांनी सांगितले की, मागच्या राज्यसभेत सरकारने एका प्रश्नाच्या उत्तरात म्हटल आहे की, 7 लाख 65 हजार भारतीयांनी देश सोडला आहे. यातील काही माझ्या ओळखीचे आहेत. त्यांनी भीतीपोटी देश सोडल्याचे वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. ही बाब धक्कादायक असून 1950 ते 2014 सालापर्यंत 7 हजार नागरिकांनी देशाला रामराम केला आहे. मात्र, 2014 साली जेव्हा भाजप-आरएसएसचे सरकार आले आहे, तेव्हापासून भारतातून तब्बल 7 लाख 65 हजार व्यवसायिकांनी देशातून पलायन केले आहे. सरकार सातत्याने म्हणत आहे की, हे हिंदूंचे सरकार आहे. मात्र, सर्वाधिक हिंदू व्यवसायिकांनी देश सोडल्याचे आंबेडकर म्हणाले. यात 100 पेक्षा कमी व्यवसायिक मुस्लिम असल्याची माहिती देखील त्यांनी दिली. सीबीआय, ईडीच्या चौकशीच्या भीतीने या व्यवसायिकांनी देश सोड्याचे प्रकाश आंबेडकर यांचे म्हणणे आहे.

पवारांसोबतचे मतभेद विसरलो :राज्यातील विषयांवर बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, आगामी विधानसभेत सेना, वंचित एकत्रित लढले तरी 150 जागा निवडून येतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आम्ही सर्वांनी मिळून महविकास आघाडी सरकारबरोबर युती केली तर, 200 पेक्षा जास्त जागा आम्हाला जिंकता येतील असेही ते म्हणाले. म्हणूनच आता दोन्ही काँग्रेसनी ठरवायचे आपण चौघांनी एकत्र यायचे की भांडत बसायचे. शरद पवारांसोबतचे मतभेद केव्हाच सोडून दिले. त्यामुळे मविआसोबत जाताना माझ्या बाजूने कोणताही किंतु परंतु नाही. तसेच जेव्हा आम्ही सेनेसोबत जाण्याचा निर्णय घेतला, तेव्हाच असे ठरवले की एकमेकांच्या नेत्यांवर टीका टाळायची. त्यामुळे आता इतर पक्षाच्या नेत्यांनीही हे तारतम्य पाळावे असा सल्लाही आंबेडकरांनी दिला. तसेच आम्ही महाविकास आघाडी सरकारमध्ये येण्याची चर्चा शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे करणार असल्याचे यावेळी आंबेडकर यांनी सांगितले.


हेही वाचा -Chandrakant Patil : काही प्रश्नाचे उत्तर कधीच मिळत नाहीत, फडवणीस मॅच्युअर राजकारणी- चंद्रकांत पाटील

ABOUT THE AUTHOR

...view details