बारामती(पुणे) - लग्नाचे आमिष दाखवत अल्पवयीन मुलीवर ४ महिने वेळोवेळी बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. प्रकरणी यशवर्धन धनजंय कोकरे (रा. म्हसोबावाडी ता. बारामती) याच्याविरोधात वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पीडित मुलीने यासंबंधी तक्रार दाखल केली आहे.
लग्नाचे आमिष दाखवत अल्पवयीन मुलीवर बलात्कार - crime news
प्रकरणी यशवर्धन धनजंय कोकरे (रा. म्हसोबावाडी ता. बारामती) याच्याविरोधात वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पीडित मुलीने यासंबंधी तक्रार दाखल केली आहे.
आधिक माहिती अशी की, बारामती तालुक्यातील खंडोबाचीवाडी या ठिकाणी डिसेंबर २०१९ ते मार्च २०२० या काळात ही घटना घडली. पीडिता अल्पवयीन आहे. हे माहिती असतानाही कोकरे याने तिला लग्नाचे आमिष दाखवत तिच्यावर वेळोवेळी बलात्कार केला. याबाबत कोणास काही सांगितले तर जीवे मारण्याची धमकी आरोपीने तिला दिली होती. त्यामुळे त्या मुलीने याआदी कोकरेविरोधात तक्रार दिली नव्हती. परंतू, आरोपी वारंवार ञास देऊ लागल्याने पीडितेने कोकरेविरोधात तक्रार दाखल केली.
वडगाव निंबाळकर पोलिसांनी आरोपीवर बलात्कारासह बाल लैगिंग अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. सदर घटनेचा सहायक पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे यांच्या मार्गदर्शनाखाली उप निरीक्षक श्रीगणेश कवितके अधिक तपास करत आहेत.