पुणे- पाऊसकाळ सुरू झाला की, वातावरणातील बदल अपरिहार्य असतो. या वातावरणात झालेल्या बदलामुळे वेगवेगळ्या रोगजंतूंची वाढ होते. या रोगजंतूंचा मानवाबरोबरच जनावरांच्या आरोग्यावरही दुष्परिणाम होत असतो. म्हणूनच पावसाळा सुरू होण्यापूर्वी जनावरांना लसीकरण करणे महत्वाचे असते. त्यामुळे बारामती तालुक्यातील ५३ हजार जनावरांना लसीकरण करण्यात आले.
पावसाळ्यात जनावरांना वेगवेगळ्या साथीचे रोग जडतात. गडूळ व दूषीत पाणी जनावरांच्या पिण्यात आल्यास तसेच पावसाळ्यात उगवलेला हिरवा चारा अधिक प्रमाणात खाण्यात आल्यास त्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतात. यातूनच जनावरांना साथीच्या रोगाची लागण होते. त्यामुळे पशुपालकांनी आपल्या जनावरांना विविध रोग प्रतिबंधात्मक लसीकरण करून घेण्याचे आवाहन बारामती तालुका पशुवैद्यकीय अधिकारी यांनी केले आहे.
बारामती तालुक्यातील ५३ हजार जनावरांना लसीकरण
पावसाळा सुरू होण्यापूर्वी जनावरांना लसीकरण करणे महत्वाचे असते. त्यामुळे बारामती तालुक्यातील ५३ हजार जनावरांना लसीकरण करण्यात आले.
बारामती तालुक्यातील ५३ हजार जनावरांना लसीकरण
म्हैस १४,४०० घटसर्प
गाय, म्हैस ५५०० फऱ्या
शेळी ७००० आंत्रविषार
कोंबडी २६००० मानमोडी / देवी
१९ व्या पशुगणनेनुसार बारामती तालुक्यातील जनावर व प्राण्यांची संख्या
गाईवर्ग- ८८०६३
म्हैसवर्ग- १५९०९
शेळ्या- ६५०७३
मेंढ्या- ९९३९३
डुकरे- २६१
कुत्रे- १२३११
घोडे- ४२८
ईमु- ००
कोंबड्या- ३१९२२६९
Last Updated : Jun 11, 2020, 8:47 PM IST