पुणे: प्लॉग्गेर्स संस्थे मार्फत २०१९ पासून शहरातील कचरा साफ करण्याची मोहीम दर शनिवार आणि रविवारी राबवली जाते.नदी , प्रमुख रस्ते, गर्दीचे ठिकाण, महाविद्यालय अश्या सर्व ठिकाणी साफ सफाईचे काम केले जाते. या संस्थेत साठ पेक्षा अधिक तरुण, लहान मुले आणि वयोवृद्ध आहेत. हा कचरा महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना दिला जातो. बाटल्यामधून टाकाऊ मधून टिकाऊ वस्तू तयार केल्या जातात. ज्या कलात्मक असतात. या वस्तूंमध्ये प्रामुख्याने शोभेचे दिवे, फुलदाणी बनवली जाते.
Unique Activities In Pune : पुण्यातील अनोखा उपक्रम, गोळा केला जातोय कचरा आणि दारूच्या बाटल्या - collecting garbage and liquor bottles
पुणे तिथं काय उणे असे म्हटले जाते आणि याची प्रचिती वेळोवेळी येते. पुण्यातील काही तरुणांनी अनोखा उपक्रम (Unique Activities In Pune) सुरू केला आहे. प्लॉग्गेर्स संस्थेच्या माध्यमातून ते 2 वर्षांपासून विविध भागात दर शनिवारी आणि रविवारी स्वच्छता (Cleanliness in various parts of the city) करतात. यात गोळा केलेला कचरा आणि दारूच्या रिकाम्या बाटल्या (collecting garbage and liquor bottles) रिसायकल केल्या जातात. या मोहिमेद्वारे आत्ता पर्यंत 100 टन कचरा आणि एका महिमेत 100 ते 200 दारूच्या बाटल्या गोळ्या केल्या आहेत.
फर्ग्युसन महाविद्यालयाच्या आवारात दारूच्या बाटल्यांचा खच...
पुण्यात फर्ग्युसन महाविद्यालय प्रसिद्ध आहे. कोरोना काळात महाविद्यालये बंदच होती. तरी तेथील एका धक्कादायक आकडेवारीमुळे खळबळ उडाली आहे. फर्ग्युसन मैदान ते फर्ग्युसन टेकडी परिसरात एका महिन्यात तब्बल आठशेहुन अधिक दारूच्या बाटल्या सापडल्याची माहिती पुणे प्लॉग्गेर्स संस्थेने दिली आहे. डिसेंबर महिन्यामध्ये ५०० बाटल्या आणि जानेवारी मध्ये तब्बल ३५० बाटल्या सापडल्या. त्या फर्ग्युसन महाविद्यालयाच्या आवारातील आहेत. बाटल्यांसह २५० किलो प्लास्टिक कचरा देखील जमा झाला आहे.