महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Pune Crime : पुण्यात आई-वडिलांना कारागृहातून सोडवण्याच्या बहाण्याने काकाचा अल्पवयीन पुतणीवर बलात्कार - Pune crime

पुण्यात धक्कादायक घटना समोर आली असून काकानेचं अल्पवयीन पुतणीवर बलात्कार केला आहे. एका फसवणुकीच्या गुन्ह्यात येरवडा कारागृहात असलेल्या आई-वडिलांना सोडवण्याचा बहाणा करत काकाने (Uncle rapes minor nephew) पुतणीवर बलात्कार केला.

Uncle rapes minor nephew on the pretext of rescuing parents from jail in Pune
पुण्यात आई वडिलांना कारागृहातुन सोडवण्याच्या बहाण्याने काकाचा अल्पवयीन पुतणीवर बलात्कार

By

Published : Nov 17, 2022, 10:33 PM IST

पुणे:पुण्यात धक्कादायक घटना समोर आली असून काकानेचं अल्पवयीन पुतणीवर बलात्कार केला आहे. एका फसवणुकीच्या गुन्ह्यात येरवडा कारागृहात असलेल्या आई-वडिलांना सोडवण्याचा बहाणा करत काकाने (Uncle rapes minor nephew) पुतणीवर बलात्कार केला. पुण्यामध्ये बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

पिडीत अल्पवयीन मुलीचे आई-वडील पुण्यातील येरवडा कारागृहात सध्या शिक्षा भोगत असून त्यांना जामिनावर बाहेर काढण्यासाठी आरोपीने पुण्यातील एका लॉजवर अल्पवयीन मुलीला नेत तिच्यावर बलात्कार केला आहे. पीडित अल्पवयीन निर्भया ही उत्तर प्रदेशातील कानपूर येथील रहिवासी असून सध्या पुण्यातील वैदुवाडी या ठिकाणी राहते. तिचे आई वडील एका फसवणुकीच्या गुन्ह्यात काही महिन्यांपासून येरवडा कारागृहात आहेत.

जेलमध्ये आई- वडीलांना भेटण्यासाठी काकाने अल्पवयीन मुलीला कारागृहाकडे न नेता एका हॉटेलवर नेत बलात्कार केला आहे. काका नराधम बनुन असे वागू लागले आहेत. बंडगार्डन पोलीस अधिक तपास करत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details