पुणे:युपीएससीच्या धर्तीवर एमपीएससीनं क्लास 1 आणि क्लास 2 च्या पदाच्या मुख्य परीक्षेसाठी वर्णनात्मक लेखी पद्धतीचा पॅटर्न राबविण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, तो 2023 पासूनचं अंमलात आणला जाणार आहे. विद्यार्थ्यांनी हा बदल स्विकारला आहे. मात्र, तो 2025 पासून लागू करावा यासंदर्भात, एमपीएससीच्या विद्यार्थ्यांसाठी उदयनराजेंनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहीलं आहे.
एमपीएससीच्या विद्यार्थ्यांसाठी उदयनराजेंचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र
युपीएससीच्या धर्तीवर एमपीएससीनं क्लास 1 आणि क्लास 2 च्या पदाच्या मुख्य परीक्षेसाठी वर्णनात्मक लेखी पद्धतीचा पॅटर्न राबविण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, तो 2023 पासूनचं अंमलात आणला जाणार आहे. यासंदर्भात, एमपीएससीच्या विद्यार्थ्यांसाठी उदयनराजेंनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहीलं आहे.
आताचं बदल केला तर विद्यार्थ्यांचं नुकसान होईलं. त्यामुळे खा. उदयनराजे भोसले यांनी एमपीएससी विद्यार्थ्यांची समस्या पत्राद्वारे देवेंद्र फडणवीसांकडे मांडली. यात लक्ष देण्यात यावं अशी मागणी केली आहे. एमपीएससी यूपीएससी विद्यार्थी अनेक वर्ष स्पर्धा परीक्षेची तयारी करत असतात त्यामुळे अचानक बदललेल्या अभ्यासक्रमामुळे त्यांना ते तयारी करत नाहीत. कोरोनामुळे आधीच नुकसान झाले आहे.
विद्यार्थ्यांना आता यूपीएससीची परीक्षा द्यायची असेल तर 2 ते 4वर्ष अगोदर तयारी करावी लागेल. त्यामुळे त्यांची समस्या आहे. 2023 पासून एमपीएससीला अभ्यासक्रम लागू न करता ते 2025 पासून करावा. अशी या विद्यार्थ्यांची अनेक दिवसांपासूनची मागणी आहे. त्याचं मागणीचा विचार करण्याची विनंती खासदार उदयनराजे भोसले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून केलेली आहे.