पुणे (पिंपरी-चिंचवड)- शहरात मुसळधार पावसात दोन तरुण बेमुदत उपोषण करत बसले असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. तो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पावसात भिजणारे तरुण हे रयत विद्यार्थी परिषदेचे असल्याची माहिती पुढे आली असून, पर्यावरणपूरक मागण्यांसाठी ते पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या समोर उपोषण करत असल्याची माहिती त्यांनी 'ईटीव्ही भारत' ला दिली आहे. सचिव रविराज काळे, ऋषिकेश कानवटे अशी त्यांची नावे आहेत.
हेही वाचा -मला जाणीवपूर्वक अडचणीत आणण्याचा प्रयत्न होतोय; माजी मंत्री पंकजा मुंडे
पिंपळे- निलख येथील जलशुद्धीकरण केंद्र पूर्ण क्षमतेने पिंपरी-चिंचवड महापालिकेने ठेकेदाराकडे भाडेतत्त्वावर न देता स्वत: पालिकेने चालवावा तसेच 8 ऑगस्टपासून 8 ऑक्टोंबरपर्यंत सांडपाण्यावर प्रक्रिया न करता सांडपाणी नदीपात्रात सोडले यांची चौकशी करून दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावा, या मागण्यांसह इतर मागण्यांसाठी ते गेल्या दोन दिवसांपासून पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या समोरच बेमुदत उपोषणाला बसले आहेत.