पुणे - इंदापूर तालुक्यातील शहा गावात २ सख्ख्या बहिणींचा भीमा नदीच्या पात्रात बुडून मृत्यू झाला. पूजा अशोक काळे (वय १०) आणि सारिका अशोक काळे (वय १२) या बहिणी रविवारी पोहायला गेल्या होत्या. या दोघींचेही मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.
पोहायला गेलेल्या सख्ख्या बहिणींचा भीमा नदीत बुडून मृत्यू - indapur
पूजा अशोक काळे (वय १०) आणि सारिका अशोक काळे (वय १२) या बहिणी रविवारी पोहायला गेल्या होत्या.
पूजा आणि सारिका शहा गावजवळील भीमा नदीच्या खोऱ्यात पोहण्यासाठी गेल्या होत्या. पुजाला पोहता येत नसल्याने सारिका तिला वाचवण्यासाठी धावली. या झटापटीत दोघींचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला. त्यांच्यासोबत असणारा बाळूने मुलींच्या नातेवाईकांना सांगितले. त्यानंतर ते मुलींच्या मदतीला धावले. मुलींचा शोध घेतला असता पुजाचा मृतदेह हाती लागला. मात्र, सारिकाचा मृतदेह सापडला नाही. अखेर प्रशासनाने पाणबुडीची मदत घेऊन सोमवारी दुपारी १ वाजता सारिकाचा मृतदेह बाहेर काढला.