पुणे- येरवडा मध्यवर्ती कारागृहातील 2 कैद्यांमध्ये मंगळवारी सकाळी हाणामारी झाली. यावेळी जखमी झालेल्या एका कैद्याला कारागृह प्रशासनाने उपचारांसाठी ससून रुग्णालयामध्ये दाखल केले आहे.
येरवडा मध्यवर्ती कारागृहातील दोन कैद्यांमध्ये हाणामारी; एक जण जखमी - two prisoners
तुषार हंबीर याला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याप्रमाणेच तुषारचा जबाब नोंदवण्यात येत असून, संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.
येरवडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कदम यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना मंगळवारी सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या घटनेमध्ये तुषार हंबीर हा कैदी जखमी झाला आहे तर, शाहरुख शेख, सलीम शेख आणि अमन अन्सारी यांनी त्याला मारहाण केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.
दरम्यान, तुषार हंबीर याला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याप्रमाणेच तुषारचा जबाब नोंदवण्यात येत असून, संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.