महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पिंपरी-चिंचवड शहरात आणखी दोन कोरोना पॉझिटिव्ह

पिंपरी-चिंचवड शहरात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. गेल्या काही दिवसांपासून पुन्हा शहरात नव्याने रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे येथील प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. आजदेखील दोन व्यक्ती कोरोनाबाधित आढळले असून त्यांच्यावर महानगर पालिकेच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पिंपरी-चिंचवड शहरात आणखी दोन कोरोना पॉझिटिव्ह
पिंपरी-चिंचवड शहरात आणखी दोन कोरोना पॉझिटिव्ह

By

Published : Apr 10, 2020, 10:54 PM IST

पुणे :पिंपरी-चिंचवड शहरात आणखी दोन व्यक्ती कोरोना विषाणू बाधित आढळले आहेत. त्यामुळे शहरातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या २५ वर पोहोचली असून यातील १२ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. दरम्यान, गेल्या दोन-तीन दिवसांत ५ रुग्ण आढळले असून १३ रुग्णांवर महानगर पालिकेच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पिंपरी-चिंचवड शहरात कोरोना विषाणुने थैमान घातले आहे. गेल्या काही दिवसांपासून पुन्हा शहरात नव्याने रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे येथील प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. आजदेखील दोन व्यक्ती कोरोनाबाधित आढळले असून त्यांच्यावर महानगरपालिकेच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यापैकी १२ व्यक्तींना कोरोनामुक्त करण्यात डॉक्टरांना यश आले असून ते बरे झाले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details