महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पिंपरी-चिंचवडमध्ये तीनचाकी टेम्पो आणि कारचा भीषण अपघात, 2 जण गंभीर - अपघात न्यूज पिपंरी चिंचवड

पिंपरीमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात दुपारी भीषण अपघात झाल्याची घटना घडली. तीनचाकी टेम्पो आणि कारच्या या अपघातात 2 जण गंभीर जखमी झाले आहेत.

two people  injured on tempo-car accident in pimpri chinchwad
पिंपरी-चिंचवडमध्ये तीनचाकी टेम्पो आणि कारचा भीषण अपघात

By

Published : May 24, 2020, 9:15 PM IST


पुणे- पिंपरीमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात दुपारी भीषण अपघात झाला. तीनचाकी टेम्पो आणि कारच्या या अपघातात 2 जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.

पिंपरी-चिंचवडमध्ये तीनचाकी टेम्पो आणि कारचा भीषण अपघात
मिळालेल्या माहितीनुसार, जुना पुणे-मुंबई महामार्गावर पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात एका तीनचाकी टेम्पो आणि कारचा भीषण अपघात झाला आहे. या जखमींमध्ये एका महिलेचा समावेश आहे. ती महिला गंभीर जखमी आहे. अपघातामध्ये टेम्पो बीआरटी मार्गाच्या दुभाजकावर गेला असून, कार रस्त्याच्या बाजूला असलेल्या कठड्यावर आदळली आहे. दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. जखमींची नावे अद्याप समजू शकली नाहीत.

ABOUT THE AUTHOR

...view details