महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

राजगुरूनगरमध्ये दोघांची विष पिऊन  आत्महत्या - rajgurunagar suicide issue

लॉकडाऊन आणि संचारबंदीमुळे अनेकांच्या हाताला काम नाही. त्यामुळे नैराश्य वाढत चालले आहे. परिणामी खेड तालुक्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी दोन जणांनी आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी घडली आहे.

suicide
राजगुरूनगरमध्ये दोघांची विषारी औषध पिऊन आत्महत्या

By

Published : Jul 22, 2020, 8:14 AM IST

राजगुरूनगर (पुणे) -खेड तालुक्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी दोन जणांनी आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी घडली आहे. राजगुरूनगर शहरालगत चव्हाण मळा येथे संतोष श्रीकृष्ण राऊत (वय-४४) यांनी राहत्या घरात विष पिऊन आत्महत्या केली. तर खरपुडी खुर्द येथे योगेश रघुनाथ भगत (२४ वर्षीय) तरुणाने नैराश्यातून विष पिऊन आत्महत्या केली. दोन्ही घटनांची राजगुरूनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मुत्यूची नोंद करण्यात आली आहे.

राजगुरुनगर येथील चव्हाणमळा येथे आत्महत्या केलेले संतोष राऊत हे अमरावती जिल्ह्यातील होते. मात्र चव्हाणमळा येथे कामानिमीत्त वास्तव्यास होते. संतोष यांच्या आत्महत्येचे कारण मात्र अद्याप अस्पष्टच आहे. तर खरपुडी खुर्द येथील योगेश भगत या तरुणाने विषारी औषध प्रशान करुन आत्महत्या केली. योगेशने आत्महत्या करण्यापूर्वी चिठ्ठी लिहून माझ्या आत्महत्येला कुणालाही जबाबदार धरू नये, असे लिहून ठेवले आहे. योगेशची आत्महत्या ही नैराश्यातून झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. गेल्या चार महिन्यांपासून कोरोना महामारीचे संकट आहे. लॉकडाऊन आणि संचारबंदीमुळे अनेकांच्या हाताला काम नाही. त्यामुळे नैराश्य वाढत चालले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details