पुणे - सध्या कोरोना विषाणूमुळे अवघा भारत लॉकडाऊन करण्यात आला आहे. अत्यावश्यक सेवा वगळून सर्व बंद ठेवण्यात आले आहे. त्यामुळे भाजीचे मार्केट सुरूच आहेत. रस्त्यावर प्रत्येक ठिकाणी पोलीस बंदोबस्त आहे. अशात काही तळीराम भाजीच्या नावाखाली गावठी दारू दुचाकीवरून घेऊन जात असताना पिंपरी वाहतूक पोलिसांना आढळले. मग काय दिला पोलिसांनी चोप. एवढेच नव्हे तर त्याच्या तोंडाला मास्क नसल्याने त्याचा शर्ट काढून तोंडालाही बांधायला लावला.
पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोनाने थैमान घातले तरी तळीरामांचे दारू पिणे चालूच..
पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाने शिरकाव केला असून १२ जण कोरोनाग्रस्त आढळले. पिंपरी येथील आंबेडकर चौकात भाजीपाला आणण्याच्या नावाखाली बाहेर पडणाऱ्या दोन तळीरामांना पोलिसांना चोप दिला.
पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोनाने थैमान घातले तरी तळीरामांचे दारू पिणे चालूच..
पोलिसांनी काठीने बॅगमधील गावठी दारूच्या बॉटल फोडून टाकली. तळीरामाने मास्कही बांधले नव्हते त्यामुळे त्याला शर्ट काढायला लावत, पोलिसांनी काठीने चोप दिला आणि शर्ट तोंडाला बांधायला लावला.
Last Updated : Mar 26, 2020, 3:26 PM IST