पुणे :पिंपरी-चिंचवड शहरात मागील २४ तासात दोन कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. काही दिवसानंतर पुन्हा कोरोनाने शहरात डोके वर काढले आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोनाबाधितांचा एकूण आकडा २२वर गेला आहे. २२ पैकी १२ जण बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. नव्याने आढळलेल्या दोन्ही रुग्णांवर महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यातील महिलेची प्रकृती अत्यंत गंभीर आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात पुन्हा आढळले दोन कोरोनाबाधित; एकाची प्रकृती चिंताजनक - कोरोना रुग्ण
पिंपरी-चिंचवड शहरात काही दिवसानंतर पुन्हा कोरोनाने डोके वर काढले आहे. बुधवारी शहरात दोन कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोनाबाधितांचा एकूण आकडा २२ वर गेला आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात एका पुरुषासह ४८ वर्षीय महिलेला कोरोना असल्याचा अहवाल बुधवारी रात्री उशिरा डॉक्टरांना मिळाला. दोघांना तत्काळ महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. ऑक्सिजन सपोर्टवर महिलेचे उपचार सुरू आहेत, अशी माहिती तेथील डॉक्टरांनी दिली.
पिंपरी-चिंचवडमधील पहिले १२ कोरोना रुग्ण पूर्णपणे बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. त्यानंतर दिल्लीवरून आलेल्या ८ जणांना कोरोना असल्याचे निष्पन्न झाले होते. त्यांच्यावरही उपचार सुरू आहेत.