पुणे- दुचाकी चोरून त्यांची बनावट कागदपत्रे तयार करून ग्रामीण भागात विकणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून दहा लाख रुपये किमतीच्या 27 दुचाकी हस्तगत केल्या आहेत. शुभम विनोद भंडारे (वय 25) आणि चेतन रवींद्र हिंगमीरे (वय 26) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. आरोपींनी अशाप्रकारे 40 ते 45 दुचाकी चोरल्या असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली.
पुण्यात दुचाकी चोरांना अटक, चोरीच्या 27 दुचाकी हस्तगत - Pune
दुचाकी चोरून त्यांची बनावट कागदपत्रे तयार करून ग्रामीण भागात विकणाऱ्या दोघांना पोलीसांनी अटक केली आहे. पोलीसांनी त्यांच्या ताब्यातून दहा लाख रुपये किमतीच्या 27 दुचाकी हस्तगत केल्या आहेत.
पुण्यात दुचाकी चोरांना अटक
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस हवालदार अमजद पठाण यांना वरील आरोपी चोरीची दुचाकी विकण्यासाठी हडपसर परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून त्यांना अटक केली. त्यांच्याकडे केलेल्या अधिक चौकशीत त्यांनी इतर दोन साथीदारांच्या मदतीने शहरात दुचाकी चोरीचे अनेक गुन्हे केल्याची कबुली दिली. चोरीची वाहने त्यांनी लातूर, परभणी, नांदेड, मुखेड या भागात बनावट कागदपत्रे तयार करून विकल्याचे सांगितले.