महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'आयटी हब' हिंजवडीतून 30 किलो गांजा जप्त, दोघे अटकेत - आयटी हब

आयटी हब असणाऱ्या हिंजवडी परिसरातून दोन व्यक्तींवर कारवाई करत सात लाखांचा 30 किलो गांजा जप्त केला आहे. ही कारवाई अंमली पदार्थ विरोधी पथकाने केली आहे. बाळू महादेव वाघमारे आणि रवींद्र प्रकाश घाडगे, अशी आरोपींची नावे आहेत.

अटकेतील आरोपी
अटकेतील आरोपी

By

Published : Nov 22, 2021, 8:56 PM IST

पिंपरी-चिंचवड (पुणे) - आयटी हब असणाऱ्या हिंजवडी परिसरातून दोन व्यक्तींवर कारवाई करत सात लाखांचा 30 किलो गांजा जप्त केला आहे. ही कारवाई अंमली पदार्थ विरोधी पथकाने केली आहे. बाळू महादेव वाघमारे आणि रवींद्र प्रकाश घाडगे, अशी आरोपींची नावे आहेत.

जप्त केलेला गांजा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंजवडी परिसरातील भुजबळ चौक येथे रिक्षातून दोन व्यक्ती येणार असून त्यांच्याकडे प्रवासी बॅगेत गांजा असल्याची गुप्त माहिती अंमली पदार्थ विरोधी पथकातील पोलीस कर्मचाऱ्याला मिळाली होती. त्यानुसार, पथकाने सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले. त्यांच्या बॅगेची झडती घेतली असता त्यामध्ये तब्बल 30 किलो गांजा सापडला. त्यानंतर पोलिसांनी त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी शिरपूर (जि. धुळे) येथून राजू नावाच्या व्यक्तीकडून ठोक स्वरूपात गांजा आणला असून पिंपरी-चिंचवड शहरात काही किरकोळ विक्री करण्यात येणार असल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी सोनटक्के यांनी दिली.

हे ही वाचा -2 crore Sound system stolen लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नाट्यगृहातील 2 कोटींचे साऊंड सिस्टीम चोरीला

ABOUT THE AUTHOR

...view details