पुणे- कार्ला येथील एकवीरा मंदिराचा कळस चोरी करणाऱ्या दोघांना पुणे ग्रामीण पोलिसांनी अखेर अटक केली आहे. तसेच त्यांनी लोणावळ्यातील तलावाजवळ लपवून ठेवलेला कळसही जप्त करण्यात आला आहे, अशी माहिती पुणे ग्रामीण पोलीस दलाचे अधीक्षक संदीप पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. राहुल गावडे आणि सोमनाथ गावंडे अशी त्यांची नावे आहेत.
संदीप पाटील म्हणाले की, राहुल गावडे आणि सोमनाथ गावंडे (वय २४, रा. अहमदनगर) अशी अटक करण्यात आलेल्या दोघा संशयितांची नावे आहेत. याप्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलिसांनी ३ ऑक्टोबर २०१७ रोजी अज्ञात व्यक्तींविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर या प्रकरणाचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे वर्ग करण्यात आला होता. मात्र, गेल्या काही दिवसांमध्ये पुणे ग्रामीण पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्याआधारे दोन्ही संशयितांना ताब्यात घेण्यात आले होते.