महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पुण्यात दारू पाजून विधवा मैत्रिणीवर लैंगिक अत्याचार, दोन मित्रांना अटक - माळवाडी

पीडितने आरडाओरडा केल्यानंतर जवळून जाणाऱ्या दोन महिला धावून आल्या. तेव्हा आरोपींनी तेथून पळ काढला. त्या महिलांनी पोलीस नियंत्रण कक्षाला फोन करून घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पीडितेला ससून रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर पोलिसांनी लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करत दोन्ही आरोपींना अटक केली.

प्रतिकात्मक छायाचित्र

By

Published : May 27, 2019, 1:20 PM IST

पुणे- तरुणीला बळजबरीने दारू पाजून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची घटना शनिवारी जिल्ह्यातील पिसोळी परिसरात डोंगरावर घडली. याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. कृष्णा बबन जाधव आणि अक्षय चव्हाण, असे आरोपींची नावे आहेत.

कोंढवा पोलीस ठाणे

पीडित तरुणी माळवाडी परिसरात राहते. मे २०१८ मध्ये तिच्या पतीचे निधन झाले. त्यामुळे ती लहान मुलाला घेऊन आईसोबत राहते. २ वर्षांपूर्वी तिची रिक्षाचालक कृष्णा जाधव याच्यासोबत ओळख झाली. दुसरा आरोपी अक्षय हा कृष्णाचा मित्र असल्यामुळे त्याच्यासोबतही तिची मैत्री झाली.

शनिवारी पीडितेला अक्षयचा फोन आला आणि कृष्णा जाधव आजारी असल्याचे सांगून भेटण्यास बोलावले. त्यानंतर अक्षय गाडी घेऊन आला आणि पीडितेला घेऊन गेला. या दोघांना गोंधळेनगर येथे आरोपी कृष्णा भेटला. त्यांनी एका दुकानातून दारू विकत घेतली. सर्व पिसोळी येथील ब्रह्मकुमारी महाविद्यालयाच्या पाठीमागे असलेल्या डोंगरावर गेले. त्याठिकाणी दोघा आरोपींनी दारू प्यायली. तसेच पीडितेलाही जबरदस्तीने दारू पाजली. त्यानंतर कृष्णा जाधव याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. अक्षय चव्हाण यानेही तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला असता तिने विरोध केला. तेव्हा अक्षयने तिला चपलेने मारहाण केली आणि जबरदस्तीने तिच्यावर अत्याचार केला.

पीडितने आरडाओरडा केल्यानंतर जवळून जाणाऱ्या दोन महिला धावून आल्या. तेव्हा आरोपींनी तेथून पळ काढला. त्या महिलांनी पोलीस नियंत्रण कक्षाला फोन करून घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पीडितेला ससून रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर पोलिसांनी लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करत दोन्ही आरोपींना अटक केली. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक देवकाते करत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details