बारामती (पुणे ) -बारामती तालुक्यातील एकूण २२ गावांनी पाणी फाऊंडेशनच्या 'समृध्द गाव' स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला आहे. लोकसहभागातून काही गावात खूप चांगले काम झाले आहे. सर्व ग्रामस्थांनी गाव पातळीवर नियोजन करुन स्पर्धेमध्ये सहभागी व्हायला हवे, असे मत जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी व्यक्त केले.
ग्रामस्थांच्या सहभागामुळे गावे टँकरमुक्त -
पाणी फाऊंडेशचे काम करत असताना बहुतंश ठिकाणी चांगली कामे झाली आहेत. ग्रामस्थांच्या चांगल्या सहभागामुळे काही ठिकाणी गावे टँकरमुक्त झाली आहेत. ही एक चांगली बाब आहे. शासकीय योजनांना लोकसमुहाची जोड मिळाली, तर खुप चांगले काम होऊ शकते. बारामती तालुक्यातील २२ गावांपैकी ५ गांवानी स्पर्धेचे निकष पूर्ण केले आहेत. बाकीच्या गावांनीही स्पर्धेचे निकष पूर्ण करुन त्यात सहभागी व्हावे, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिल्या आहे. बारामती तालुक्यात पाणी फाऊंडेशने प्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी आणि ग्रामस्थ यांच्यामध्ये समन्वय चांगला आहे. असाच समन्वय टिकवून ठेवून चांगल्या प्रकारे कामे करा, असेही त्यांनी सांगितले.