महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Exam Fever 2022 : बारावीची पुरवणी परीक्षा २१ जुलै ते १२ ऑगस्ट दरम्यान; प्रवेशपत्र ऑनलाइन मिळणार - राज्य मंडळाचे सचिव

राज्य मंडळातर्फे बारावीच्या विद्यार्थ्यांची पुरवणी परीक्षा (Twelfth supplementary examination) २१ जुलै ते १२ ऑगस्ट या कालावधीत ( between 21st July to 12th August) होणार आहे. या परीक्षेसाठी आतापर्यंत ५२ हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून, परीक्षेसाठीचे प्रवेशपत्र (Admission card) विद्यार्थ्यांना शनिवारपासून ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.राज्य मंडळाचे सचिव (Secretary of State Board) डॉ. अशोक भोसले यांनीही माहिती दिली.

Twelfth supplementary examination
बारावीची पुरवणी परीक्षा

By

Published : Jul 8, 2022, 10:52 PM IST

पुणे:बारावीच्या मार्च-एप्रिलमध्ये झालेल्या परीक्षेतील अनुत्तीर्ण, श्रेणी सुधारू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पुरवणी परीक्षा घेतली जाते. त्यानुसार बारावीची, बारावीच्या व्यवसाय अभ्यासक्रमाची परीक्षा २१ जुलैपासून सुरू होणार आहेत. प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा २० जुलै, ते ८ ऑगस्ट या कालावधीत होईल. शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांनी https://www.mahahssc board.in या संकेतस्थळाद्वारे उपलब्ध करून दिलेल्या प्रवेशपत्राची प्रत काढून त्यावर मुख्याध्यापकांनी शिक्का आणि स्वाक्षरी करून विद्यार्थ्यांना द्यावी. त्यासाठी वेगळे शुल्क घेऊ नये. प्रवेशपत्रातील माध्यम आणि विषया बाबत बदल असल्यास शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांनी त्या विभागीय मंडळातून दुरुस्त करून घ्याव्यात, प्रवेशपत्रातील छायाचित्र, नाव, स्वाक्षरी याबाबत दुरुस्ती शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांनी त्यांच्या स्तरावर करून त्याची एक प्रत विभागीय मंडळाला पाठवावी, प्रवेशपत्र गहाळ झाल्यास दुसरी प्रत देऊन त्यावर द्वितीय प्रत असा शेरा द्यावा, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details