पुणे - आषाढीनिमित्त राज्यातील विविध भागातील मानाच्या पालख्या पंढरीकडे रवाना होण्यास सज्ज आहेत. यंदाच्या वारी सोहळ्यात जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या पालखीचा रथ ओढण्याचा मान पुण्याजवळील आंबेगाव बुद्रुक येथील शेतकरी रवींद्र बाळासाहेब कोंढरे-पाटील यांच्या सोन्या-सुंदर या बैलजोडीला मिळाला. त्यानंतर गणपती बाप्पा मोरया... ज्ञानोबा माऊली तुकाराम...च्या जयघोषाने मंडई गणपती मंदिरात तुकाराम महाराज पालखी रथाचे सारथ्य करणास सज्ज असलेल्या सोन्या-सुंदर या बैलजोडीने शारदा गजानन चरणी मानवंदना दिली.
तुकाराम महाराजांच्या पालखीचा रथ ओढण्याचे मान आंबेगावच्या कोंढरे-पाटलांच्या बैलजोडीला - aashadi wari
आषाढी वारीला अवघे काही दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे यानिमित्त जगद्गुरू तुकाराम महाराज यांच्या पालखीचे पुण्यात पूजन करण्यात येथे. यानिमित्त वारीत पालखी ओढण्यासाठी बैलजोडीची निवड केली जाते. यंदा हा मान आंबेगावातील कोंढरे-पाटील यांच्या बैलजोडीला मिळाला.
संतांच्या पालखी रथाला आपली बैलजोडी जुंपली जावी, अशी अनेक शेतकऱ्यांची इच्छा असते ही बाब अत्यंत मानाची मानली जाते, त्यामुळे सोन्या आणि सुंदर या बैलांच्या मालकांसाठी यंदा ही अभिमानाची बाब ठरली. आता वारीला अवघे काही दिवस शिल्लक आहेत २४ जूनला देहूतून तुकाराम महाराजांची पालखी पंढरपूरकडे मार्गस्थ होणार आहे त्यापूर्वी या बैल जोडीला पुण्यात आणण्यात आले होते. देहूकडे प्रस्थान करण्यापूर्वी पुण्यामध्ये या बैलजोडीचे आगमन झाल्यानंतर मंडई मंडळातर्फे स्वागत व पूजन करण्यात आले. अखिल मंडई मंडळातर्फे मंडईतील शारदा-गजानन मंदिरात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
आंबेगाव बुद्रुक येथील शेतकरी रवींद्र बाळासाहेब कोंढरे-पाटील यांच्या सोन्या आणि सुंदर या देखण्या बैलजोडीची निवड यंदा पालखी सोहळ्याकरीता करण्यात आली. प्रथमच चिठ्ठी निवड प्रक्रियेने दोन बैलजोडया निवडल्या गेल्या. आंबेगाव बुद्रुक या गावातून प्रथमच तुकोबांच्या पालखीला बैलांचा मान मिळाला आहे. देहू ते पंढरपूर हा पालखी मार्ग मोठा कष्टप्रद आहे याकाळात रथ ओढणाऱ्या बैलांचे स्वास्थ्य उत्तम असणे गरजेचे असते हे बैलाचे तब्येत निरोगी असावे लागते. त्यामुळे बैल जोडी मालक आपल्या बैलांची वर्षभर विशेष काळजी घेत असतात आणि हा मान पटकवण्यासाठी त्यांचा प्रयत्न असतो.