पुणे - पंढरीच्या वाटेवर असलेल्या संत तुकोबांच्या पालखीने सोमवारी बारामती तालुक्यात प्रवेश केला. पंढरीच्या भेटीची आस! हाती टाळ, त्यास मृदंगाची साथ.. हरी नामाचा गजर करत रोटी घाट वारकरी तुकोबारायांच्या गजरात पार करतात. भक्तीमय वातावरणात रोटी घाट सर करून संत तुकोबाची पालखी बारामती तालुक्यात दाखल झाली. उंडवडी गावाच्या हद्दीत गुंजखेडा येथील शिवेवर पालखीचे स्वागत करण्यात आले.
संत तुकोबांची पालखी बारामती तालुक्यात दाखल; पालखी सोहळा आज उंडवडी मुक्कामी - पुणे
पंढरीच्या वाटेवर असलेल्या संत तुकोबांच्या पालखीने सोमवारी बारामती तालुक्यात प्रवेश केला. आज पालखी सोहळा उंडवडी मुक्कामी असणार आहे.
हाक वारीची आली, पावलं निघाली
वरसाची ताटातूट, जिवाला लागली
सोबती झाले गोळा, गळाभेट झाली
भारावली मनं, पालखी घेतली...अशा प्रकारे गळा भेटीने वारकरी सुखावला. वारकऱ्यांच्या दिंड्या आपापल्या राहुट्यात विसावल्या. उंडवडीत विठ्ठल भक्तांची अलोट गर्दी, टाळ-वीणासोबतीला हरिनामाच्या गजरात सर्वत्र वारकरी तल्लीन झाले होते. अनेक मंडळे, अनेक समाजसेवी संस्था आपापल्या परीने वारकऱ्यांच्या सेवेत मग्न होती. पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. टाळकरी, विणेकरी, चोपदार, पालखी सोहळ्याचे अनेक पदाधिकारी यांचे बारामती तालुक्यातील व उंडवडी ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहात स्वागत केले. आज पालखी सोहळा उंडवडी मुक्कामी असणार आहे.