बारामती -महिलांवरील अत्याचारास प्रतिबंध व्हावा. महिला व मुलींच्या संबंधित समस्यांचे निराकारण लवकरात लवकर व्हावे, यासाठी बारामतीच्या उपविभागीय पोलीस कार्यालयात 'भरोसा सेल'ची स्थापना करण्यात आली.
बारामतीच्या उपविभागीय पोलीस कार्यालयात 'भरोसा सेल'ची स्थापना... हेही वाचा... हिंगणघाट जळीत प्रकरण : पीडितेने रुग्णालयात नेताना व्यक्त केली होती 'ही' भावना
उपविभागीय पोलीस कार्यालयात भरोसा सेलची (मदत कक्ष) स्थापना करण्यात आली. यावेळी नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर, आयएमएच्या बारामतीच्या अध्यक्षा डॉ. विभावरी सोळुंके, सहायक पोलीस निरिक्षक अश्विनी शेंडगे यांच्यासह पोलीस निरिक्षक औदुंबर पाटील, प्रमोद पोरे, संपत गोसावी, दिलीप बरकडे, प्रकाश वाघ आदी उपस्थित होते.
हेही वाचा... औरंगाबादेत सातवीतील विद्यार्थिनीला शिक्षकानेच दाखवले पॉर्न व्हिडिओ; गुन्हा दाखल
भरोसा सेल व दामिनी पथक यांच्या माध्यमातून पीडित महिला व मुली यांना एकाच ठिकाणी सर्व प्रकारची मदत व सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. या माध्यमातून संकटात सापडलेल्या महिला व मुलींकरिता पोलीस, वैद्यकीय सेवा, मानसोपचार तज्ज्ञ, समुपदेशन, विधी तज्ज्ञ, संरक्षण अधिकारी व पुनर्वसन या सेवा तात्काळ पुरवून त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी हा सेल उपयोगी ठरणार आहे. हिंसाचाराचे लक्ष्य ठरलेल्या महिला व मुलांना भरोसा सेलमुळे अत्याचाराविरुध्द लढण्यासाठी मानसिक बळ मिळणार आहे.