महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Baramati acident : ट्रकने दुचाकीस्वाराला चिरडले; पती पत्नी जागीच ठार

गुरुवारी सकाळी सव्वा अकराच्या दरम्यान माल ट्रक हा पाटसकडून बारामतीकडे भरधाव वेगाने निघाला होता. याचवेळी सोनवडी सुपे फाट्यावर दुचाकी स्पेलंडर बारामतीच्या (Baramati) दिशेने निघाली असता, माल ट्रकचालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रकने दुचाकीस्वाराला चिरडले

ट्रकने दुचाकीस्वाराला चिरडले
ट्रकने दुचाकीस्वाराला चिरडले

By

Published : Nov 18, 2021, 5:43 PM IST

बारामती -पाटस रस्त्यावर सोनवडी सुपे फाट्यावर भरधाव ट्रकने दुचाकीवरील दोघांना चिरडले. या अपघातात दुचाकीवरील पती-पत्नी जागीच ठार झाल्याची घटना आज गुरुवारी सकाळी घडली. या अपघातात देऊळगावचे काळूराम गणपत लोंढे, शाकूबाई काळूराम लोंढे या पती पत्नीचा मृत्यू झाला.

बारामतीजवळ झाला अपघात

गुरुवारी सकाळी सव्वा अकराच्या दरम्यान माल ट्रक हा पाटसकडून बारामतीकडे भरधाव वेगाने निघाला होता. याचवेळी सोनवडी सुपे फाट्यावर दुचाकी स्पेलंडर बारामतीच्या दिशेने निघाली होती. यावेळी माल ट्रकचालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रकने दुचाकीस्वाराला चिरडले. अपघातानंतर ट्रकचा चालक व क्लिनर पळून गेले. या अपघातात मालाने भरलेल्या ट्रकखाली दुचाकी आणि पती- पत्नी दोघेही अडकल्याने स्थानिक ग्रामस्थ व पोलिस मित्रानी त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, ट्रकमध्ये माल असल्याने आणि ट्रक चारीत अडकल्याने जाग्यावरुन हलू शकला नाही.

ट्रकने दुचाकीस्वाराला चिरडले
हेही वाचा -Jayant Patil on Param Bir Singh : मदत केल्याशिवाय परमबीर सिंग देशाबाहेर जाऊ शकत नाहीत - जयंत पाटील

ABOUT THE AUTHOR

...view details