पुणे -कोंढव्यातील 15 जणांचा बळी घेणारी दुर्घटना ताजी असतानाच त्याची पुनरावृत्ती झाल्याची आणखी एक घटना घडली. मुसळधार पावसामुळे आंबेगाव येथील सिंहगड महाविद्यालयाची सीमाभिंत मजुरांच्या झोपड्यांवर कोसळून मध्यरात्री दीडच्या सुमारास झालेल्या भीषण दुर्घटनेत सहा जणांचा मृत्यू झाला. तर तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत.
राधेलाल पटेल (वय 25), जेटू लाल पटेल (वय.50), ममता राधेलाल पटेल (वय.22), जितू चंदन रवते (वय.24), जेटूलाल पटेल(45) , ममता पटेल (वय. 24), ममता पटेल (वय.24) अशी मृतांची नावे आहेत. मृतांमध्यील ४ जण मुळचे छत्तीसगड तर, २ हे मध्य प्रदेश राज्याचे रहिवाशी असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
पुण्यातील सिंहगड महाविद्यालयाची संरक्षण भिंत कोसळली, 6 जणाचा मृत्यू आंबेगाव बुद्रुक परिसरात सुरू असलेल्या एका बांधकाम साईटवर हे मजूर काम करत होते. जवळच त्यांच्या राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती. सिंहगड कॅम्पसच्या सीमाभिंतीलगत या मजुरांच्या तात्पुरत्या झोपड्या होत्या. सर्वजण गाढ झोपेत असताना ही सीमाभिंत अचानक कोसळली आणि त्याखाली मजुरांच्या झोपड्या गाडल्या गेल्या. पडलेल्या भिंतीच्या ढिगाऱ्याखाली मजूर आणि त्यांचे कुटुंबीय अडकून पडले होते.
दुर्घटनेचे वृत्त समजताच पुणे महापालिकेच्या अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले त्यांनी युद्धपातळीवर बचावकार्याला सुरुवात केले. आतापर्यंत अग्निशामक दलाने ६ पुरुष व ३ महिलांना जखमी अवस्थेत बाहेर काढले. त्यापैकी सहाजणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृतांमध्ये चार पुरुष आणि तीन महिलांचा समावेश आहे.