मुंबई Train Cancel : उत्तर मध्य रेल्वेच्या आग्रा विभागातील मथुरा जंक्शन रेल्वे स्थानकावर यार्ड रिमॉडेलिंग काम करण्यात येणार आहे. त्यामुळं भुसावळ विभागातून मनमाड मार्गे धावणाऱ्या 20 रेल्वे 12 जानेवारी ते 6 फेब्रुवारी या कालावधीत रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळं प्रवाशांची चांगलीच अडचण होणार आहे.
कोणत्या गाड्या, किती कालावधीसाठी रद्द :
- - दादर ते अमृतसर एक्सप्रेस, 20 जानेवारी चे 3 फेब्रुवारी दरम्यान रद्द
- - अमृतसर ते दादर एक्सप्रेस, 23 जानेवारी ते 6 फेब्रुवारी दरम्यान रद्द
- - कोल्हापूर ते हजरत निजामुद्दीन दिल्ली एक्सप्रेस, 30 जानेवारी रोजी रद्द
- - हजरत निजामुद्दीन दिल्ली ते कोल्हापूर एक्सप्रेस, 1 फेब्रुवारी रोजी रद्द
- - कुर्ला ते हरिद्वार एक्सप्रेस, 22 जानेवारी ते 1 फेब्रुवारी दरम्यान रद्द
- - हरिद्वार ते कुर्ला एक्सप्रेस, 23 जानेवारी ते 2 फेब्रुवारी दरम्यान रद्द
- - यशवंतपूर ते हजरत निजामुद्दीन दिल्ली एक्सप्रेस, 23 जानेवारी ते 1 फेब्रुवारी दरम्यान रद्द
- - हजरत निजामुद्दीन दिल्ली ते यशवंतपुर एक्सप्रेस, 26 जानेवारी ते 7 फेब्रुवारी दरम्यान रद्द
- - नांदेड ते अमृतसर सचखंड सुपरफास्ट एक्सप्रेस, 21 जानेवारी ते 4 फेब्रुवारी दरम्यान रद्द
- - अमृतसर ते नांदेड संचखड सुपरफास्ट एक्सप्रेस, 23 जानेवारी ते 6 फेब्रुवारी दरम्यान रद्द
- - नांदेड ते जम्मूतावी हमसफर साप्ताहिक एक्सप्रेस, 26 जानेवारी व 2 फेब्रुवारी रोजी रद्द
- - जम्मूतावी ते नांदेड हमसफर साप्ताहिक एक्सप्रेस, 28 जानेवारी व 4 फेब्रुवारी रोजी रद्द
- - नांदेड ते हजरत निजामुद्दीन दिल्ली मराठवाडा संपर्क क्रांती साप्ताहिक सुपरफास्ट एक्सप्रेस, 23 व 30 जानेवारी रोजी रद्द
- - हजरत निजामुद्दीन दिल्ली ते नांदेड मराठवाडा संपर्क क्रांती साप्ताहिक सुपरफास्ट एक्सप्रेस, 24 व 31 जानेवारी रोजी रद्द
- - हजरत निजामुद्दीन दिल्ली ते मैसूर स्वर्ण जयंती एक्सप्रेस, 15,19 जानेवारी व 5 फेब्रुवारी रोजी रद्द
- - मैसूर ते हजरत निजामुद्दीन दिल्ली स्वर्ण जयंती एक्सप्रेस, 12,16 जानेवारी व 2 फेब्रुवारी रोजी रद्द