पुणे- मुंबई-बंगळुरू महामार्गावर मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणावर पाणी साठले होते. त्यामुळे महामार्गावर नागरिकांना काही काळ वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला आहे.
मुंबई-बंगळुरू महामार्गावर मुसळधार पावसामुळे वाहतूक प्रभावित - मुंबई-बंगळुरू
गेले काही दिवस विश्रांती घेतल्यानंतर शनिवारी पुन्हा भोर तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस पडला आहे. त्यामुळे पावसामुळे महामार्गाचे रूपांतर नदीमध्ये झाले होते.
पावसामुळे महामार्गाचे रूपांतर नदीमध्ये झाले होते.
प्राथमिक माहितीनुसार, गेले काही दिवस विश्रांती घेतल्यानंतर शनिवारी पुन्हा भोर तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस पडला आहे. त्यामुळे महामार्गाच्या कडेला असलेल्या डोंगराळ भागांमधून मोठ्या प्रमाणावर पाणी नव्याने बांधलेल्या रस्त्यावर वाहून आल्यामुळे महामार्गाचे रूपांतर नदीमध्ये झाले होते.
दरम्यान, महामार्गावर पाणी साठल्यामुळे काही वेळ पुणे ते सातारा दरम्यानची वाहतूक प्रभावित झाली होती.