महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

डॉ. कोल्हेंनी किल्ल्यातल्या बाभळी आधी काढाव्या -पर्यटनमंत्री रावळ - छत्रपती शिवाजी महाराज

किल्ल्यात वाढलेल्या बाभळी बुलडोझर नेऊन काढाव्यात आणि मग किल्ल्यांवर बोलावे, असा सल्ला पर्यटन मंत्री जयकुमार रावळ यांनी खासदार अमोल कोल्हे यांना दिला.

पर्यटनमंत्री रावळ

By

Published : Sep 7, 2019, 9:05 AM IST

Updated : Sep 9, 2019, 5:22 PM IST

पुणे- डॉ. अमोल कोल्हे 'लक बाय चान्स' खासदार झाले आहेत. त्यांनी शनिवार, रविवारी वेळ काढावा, अनेक किल्ल्यात वाढलेल्या बाभळी बुलडोझर नेऊन काढाव्यात आणि मग किल्ल्यांवर बोलावे, असा सल्ला पर्यटन मंत्री जयकुमार रावळ यांनी खासदार अमोल कोल्हे यांना दिला.

डॉ. कोल्हेंनी किल्ल्यातल्या बाभळी आधी काढाव्या -पर्यटनमंत्री रावळ


जयकुमार रावळ म्हणाले, फी घेऊन एखाद्या कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली म्हणजे त्यांना लोकांना भडकवण्याचा अधिकार प्राप्त होत नाही. निवडणुकीच्या तोंडावर राजकारण करण्यासाठी गडकिल्ल्यांच्या आणि छत्रपतींच्या इतिहासाचा वापर करणे ही चुकीची प्रवृत्ती आहे. अमोल कोल्हे हे जबाबदार नागरिक आहेत. त्यांनी इतिहासाचा वापर चुकीच्या कामासाठी करू नये. या गडकिल्ल्यांचे संवर्धन कसे होईल याची चिंता त्यांना असली पाहिजे. याउलट गडसंवर्धनासाठी काही चांगल्या कल्पना असतील तर त्या सांगा, पण ही लग्नाची कल्पना तुमच्याकडेच ठेवा.

हेही वाचा -गड किल्ल्यांवर हॉटेल आणि मॅरेज हॉल कदापि होऊ देणार नाही - खासदार छत्रपती संभाजीराजे

Last Updated : Sep 9, 2019, 5:22 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details