पुणे - पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोनाबाधितांचा आकडा वाढत आहे. येथील चिखली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कोरोनाबाधित आढळले आहेत. आता पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील कोरोनाबाधितांची संख्या 14 वर पोहोचली आहे. यासोबतच 8 पोलीस कर्मचारी-अधिकाऱ्यांनी कोरोनावर मात केली आहे. तर 6 जणांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मार्च महिन्यात पिंपरी-चिंचवडसह देशात कोरोनाचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात वाढला. त्यामुळे संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आले. संचारबंदी, जमावबंदीचे आदेश राज्य शासनाने दिले होते. या सर्व परिस्थितीत पोलीस कर्मचारी आणि अधिकारी दिवसरात्र आपले कर्तव्य चोख बजावत आहेत.