पुणे- देवाच्या आळंदी नगरीमध्ये आषाढीवारी निमित्त वैष्णवांचा मेळावा होत आहे. त्यासाठी देशभरातून अनेक वारकरी भाविक आळंदी नगरीत दाखल होत आहेत. या येणाऱ्या भाविकांना व वारकऱ्यांसाठी आळंदी नगरपरिषदेच्यावतीने पुरुष व महिलांसाठी वेगवेगळे मोबाईल शौचालय उभारण्यात आले आहेत.
आळंदी नगरीत वारकरी भाविकांसाठी प्रशासनाकडून शौचालयाची व्यवस्था - आळंदी
पुढील 2 दिवसांमध्ये देवाच्या आळंदी नगरीमध्ये आषाढी वारीच्या पालखी सोहळ्याला सुरुवात होत आहे. वारकरी दिंड्या आळंदी नगरीत दाखल होत आहेत.
पुढील 2 दिवसांमध्ये देवाच्या आळंदी नगरीमध्ये आषाढी वारीच्या पालखी सोहळ्याला सुरुवात होत आहे. वारकरी दिंड्या आळंदी नगरीत दाखल होत आहेत. त्यामुळे येणाऱ्या वारकरी भाविकांसाठी मोबाईल शौचालयाची व्यवस्था करण्यात आली आहे.
आळंदी नगर परिषदेच्या माध्यमातून मोबाईल शौचालये उभारण्यात आली आहेत. आळंदीमधील 4 मुख्य चौकांमध्ये महिला शौचालय व पुरुष शौचालय, अशी वेगवेगळ्या पद्धतीने मोबाईल शौचालयाची मांडणी करण्यात आली आहे. या शौचालयामध्ये स्वच्छता व मुबलक पाणी, अशी सुविधा देण्यात आली आहे. शौचालयाच्या परिसरामध्ये कुठलीही दुर्गंधी होणार, यासाठीही प्रशासनाकडून काळजी घेण्यात आली आहे.