पुणे -राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कामाचा धडाका सर्वश्रृत आहे. आज त्यांच्या काम करण्याच्या याच पद्धतीमुळे अधिकारी वर्गाची चांगलीच दमछाक झाल्याचे दिसून आले. अजित पवार यांनी पुणे येथे सकाळी-सकाळीच आपल्या पाहणी दौऱ्याला सुरुवात केल्याने अधिकाऱ्यांची तारांबळ उडाली होती. सकाळी लवकर उठून काम करण्याची सवय असल्याची माहिती यावेळी पवार यांनी दिली आहे. तसेच शरद पवारांनाही सकाळी लवकर उठून कामाला लागायची सवय असल्याचे अजित पवार यावेळी म्हणाले.
'उपमुख्यमंत्र्यांच्या भल्या सकाळच्या दौऱ्यामुळे अधिकाऱ्यांची दमछाक'
अजित पवार यांनी आज पुण्यातील शिवाजीनगर येथील नव्याने बांधकाम सुरू असलेल्या व जुन्या पोलीस वसाहतीची पाहणी केली. पोलीस कर्मचारी यांच्या कुटुंबियांशी संवाद साधला.
हेही वाचा - LIVE : संमेलनाच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी व्यासपीठ सज्ज; गोरोबा काका नगरीत मान्यवरांची उपस्थिती
अजित पवार यांनी आज पुण्यातील शिवाजीनगर येथील नव्याने बांधकाम सुरू असलेल्या व जुन्या पोलीस वसाहतीची पाहणी केली. पोलीस कर्मचारी यांच्या कुटुंबीयांशी संवाद साधला. पोलीस कुटुंबीयांच्या अडचणी सोडविण्यासाठी लवकरात लवकर वसाहतीचे काम पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. शिवाय पुणे शहर आणि जिल्हा प्रशासनाच्या विविध अधिकाऱ्यांशीही विविध प्रश्नांवर चर्चा केली.