पुणे - पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या परिसरात तीन पिस्तुल आणि चार जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात आली आहेत. ही कारवाई वाहनचोरी विरोधी पथक, गुन्हे शाखा युनिट ३ आणि निगडी पोलिसांनी केली. यापैकी, दोन पिस्तुल आणि तीन जिवंत काडतुसे हे चाकण परिसरातून तर, एक पिस्तुल आणि एक जिवंत काडतुस हे निगडी परिसरातून मिळाले. पिस्तुल विक्री करण्यासाठी आलेल्या दोघांना अटक करण्यात आली आहे. सचिन जनार्धन इंगळे(वय ३३ रा.भुगाव) आणि रामप्रसाद संतोष सोळंखी असे अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतून तीन पिस्तुल आणि चार जिवंत काडतुसे हस्तगत
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या परिसरात तीन पिस्तुल आणि चार जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात आली आहेत. पहिली कारवाई ही चाकण परिसरात करण्यात आली तर दुसरी कारवाई निगडी परिसरात करण्यात आली. पिस्तुल विक्री करण्यासाठी आलेल्या दोघांना अटक करण्यात आली आहे. सचिन जनार्धन इंगळे(वय ३३ रा.भुगाव) आणि रामप्रसाद संतोष सोळंखी असे अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.
हेही वाचा -औद्योगिक नगरी पुण्यातील चाकणमध्ये नक्षलवादी तरुणाला अटक
पहिली कारवाई ही चाकण परिसरात करण्यात आली. पोलीस कर्मचारी सचिन उगले यांना माहिती मिळाली की, चाकण तळेगाव रोडवर एक जण पिस्तुल विक्रीसाठी येणार आहे. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक विवेक मुगळीकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश कांबळे यांच्या मदतीने सापळा रचून आरोपी सचिन इंगळेला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडे दोन पिस्तुल आणि तीन जीवंत काडतुसे मिळाली आहेत. दुसऱ्या कारवाईत निगडी पोलीस ठाण्यातील काही पोलीस कर्मचारी हे गस्त घालत होते. तेव्हा, पोलीस कर्मचारी प्रवीण मुळूक यांना माहिती मिळाली की, अंकुश चौक येथे पिस्तुल विक्रीसाठी एक व्यक्ती येणार आहे. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील टोपणे यांच्या मार्गदर्शनाखाली अंकुश चौकात सापळा रचण्यात आला. तिथूनआरोपी रामप्रसादला अटक करण्यात आली. त्याच्याकडे एक पिस्तुल आणि एक जिवंत काडतुस मिळाले आहे.