पुणे - पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील दौंड तालुक्यातील मळद गावच्या हद्दीत चारचाकी आणि दुचाकीच्या अपघात तीघे जागीच ठार झाले आहेत. अपघातातील मृतांची नावे समजू शकली नाहीत. या अपघाताची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी हजर होत अपघातग्रस्त वाहने बाजूला काढली.
पुणे-सोलापूर महामार्गावर चारचाकीची दुचाकीला धडक, तीन जण जागीच ठार - तीघे जागीच ठार
पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील दौंड तालुक्यातील मळद गावच्या हद्दीत चारचाकी आणि दुचाकीच्या अपघात तीघे जागीच ठार झाले आहेत.
या अपघाताबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्याकडून सोलापूरच्या दिशेने जाणारी चारचाकी (क्र. एम एच 12 एन पी 0613) गाडीचा टायर फुटला. यामुळे चालकाचा चारचाकीवरील नियंत्रण सुटले. त्यानंतर ही चारचाकी पुणे-सोलापूर महामार्गावरील दुभाजक ओलांडून पलीकडील बाजूने पुण्याकडे जाणाऱ्या दुचाकीला धडक दिली. या धडकेत दुचाकीवरील तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. हे तीघे कर्जत येथील असल्याची प्राथमिक माहिती मिळते. दोघे जण जखमी झालेत, त्यांना दौंड येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याची माहिती मिळाली आहे.
या घटनेची माहिती मिळताच रावणगाव कुरकुंभ आणि दौंड पोलीस ठाण्यातील पोलीस आणि वाहतूक पोलीस घटनास्थळी दाखल झाले. अपघाताची माहिती मिळताच पुणे- सोलापूर महामार्गावरील पाटस येथील टोल नाक्याची रुग्णवाहिका घटनास्थळी हजर झाली.